शासन आपल्या दारी”पोहरादेवी येथे रोजगार मेळावा संपन्न




“शासन आपल्या दारी”

पोहरादेवी येथे रोजगार मेळावा संपन्न

      वाशिम, दि. 09 (जिमाका) :  जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने श्रीक्षेत्र पोहरादेवी संस्थान, ग्रामपंचायत वसंतनगर येथे 8 जून रोजी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि शासनाच्या इतर विविध योजनांचा उमेदवारांना लाभ व्हावा, याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात गावातील महिला बचत गटाच्या महिला व पोहरादेवी संस्थानातील ग्रामस्थांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ व्हावा, याकरीता कर्ज आणि अनुदानासंबंधी माहिती देण्यात आली. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित करण्यात आला. सरपंच यांच्याकडून इच्छुक उमेदवारांची उद्योग उभारणीसाठी त्यांच्या गरजेनुसार यादी मागविण्यात आली.  कार्यक्रमाला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, उद्योग निरीक्षक ओमेश पायघन, मीटकॉनचे प्रतिनिधी सत्येंद्र भगत, धीरज भगत, युवा उद्योजक अभिजीत राठोड, संस्थानाचे ट्रस्टी व महिला बचतगटातील 60 ते 70 स्त्रिया उपस्थित होत्या.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर