कुपटा आरोग्य केंद्रात दिली आरोग्यासह अन्य योजनांची माहिती लाभार्थ्यांना आभा कार्डचे वितरण


कुपटा आरोग्य केंद्रात दिली
आरोग्यासह अन्य योजनांची माहिती

लाभार्थ्यांना आभा कार्डचे वितरण

वाशिम दि.10 (जिमाका) शासन अनेक लोककल्याणकारी योजना आहेत, पण लाभार्थ्यांना योजनांची माहिती नसल्याने त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात " शासन आपल्या दारी " हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मानोरा तालुक्यातील कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 10 जून रोजी आरोग्य विभागाच्या योजनांसह अन्य योजनांची माहिती रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.यावेळी काही लाभार्थ्यांना डॉ. जाधव यांच्या हस्ते आभा कार्डचे वितरण करण्यात आले. 
          यावेळी प्रा.आ.केंन्द्र कुपटाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभांगी जाधव, डॉ.पुरी, डॉ.मनवर, डॉ. राठोड,औषध निर्माण अधिकारी श्री.बागडे,आरोग्य सेविका आशा झाटे,प्रयोगशाळा तंत्रज्ञ पवन साबळे कर्मचारी श्री.खंडारे, श्रीमती कोकरे,श्रीमती डोंगरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश