शासन आपल्या दारी : वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील 10 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप




शासन आपल्या दारी

वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील

 10 हजार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

        वाशिम, दि. 26 (जिमाका) : शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व लाभार्थ्यांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी विविध योजनांचा लाभ तातडीने मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयात या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध शासकीय यंत्रणा शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत हर घर दस्तक हा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरोघरी जात आहे. वाशिम तालुक्यातील 8 मंडळातील 10 हजार 722 लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत आयोजित हर घर दस्तक कार्यक्रमातून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

            16 जून रोजी वाशिम मंडळातील 1 हजार 150 लाभार्थ्यांना, राजगांव मंडळातील 1 हजार 375, 20 जून रोजी पार्डी (आसरा) येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात 1 हजार 210 लाभार्थ्यांना, अनसिंग येथील कार्यक्रमात 1 हजार 805 लाभार्थ्यांना, 22 जून रोजी पार्डी (टकमोर) येथे आयोजित कार्यक्रमात 850 लाभार्थ्यांना, 23 जून रोजी कोंडाळा (झामरे) येथील कार्यक्रमात 920 लाभार्थ्यांना, नागठाणा येथील कार्यक्रमात 1 हजार 764 लाभार्थ्यांना आणि केकतउमरा येथील कार्यक्रमा 1 हजार 648 लाभार्थ्यांना अशा एकूण 8 मंडळातील 10 हजार 722 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप संबंधित गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

           या लाभार्थ्यांना या कार्यक्रमातून मान्यवरांच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले, सातबारा, आठ-अ, बियाणे व यंत्र वाटप, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, शौचालय प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बेबी किट व लहान मुलांना आहार वाटप करण्यात आला. त्यामुळे या लाभार्थ्यांची मंडळस्तर व तालुकापातळीवर हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारी पायपिट थांबली. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व पैशाची बचत होण्यास शासन आपल्या दारी या उपक्रमाची मदत झाली आहे. हे प्रमाणपत्र संबंधित लाभार्थ्यांना तातडीने गावपातळीवर उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत असून लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.         

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे