8 जून रोजी नगर परिषद सभागृहात‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम



8 जून रोजी नगर परिषद सभागृहात

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

       वाशिम, दि. 07 (जिमाका) :  शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत योजनांचा लाभ देणे हा उद्देश आहे. नगर परिषद, वाशिम येथील सभागृहात 8 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार लखन मलिक व जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन तहसिलदार, वाशिम यांनी केले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे