मदरसा आधुनिकीकरण योजना३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले


मदरसा आधुनिकीकरण योजना
३० जूनपर्यंत प्रस्ताव मागविले

वाशिम दि.०१(जिमाका) मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२३-२४ या वर्षात राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील   अनुदानासाठी इच्छुक पात्र मदरसा चालक / संस्थांकडून ३० जुन २०२३  पर्यत नियोजन भवन,जिल्हाधिकारी  कार्यालय,वाशिम येथे कार्यालयीन  वेळेत आपले परिपूर्ण प्रस्ताव मागविले आहे.   
           प्रस्तावासोबत पुढील  कागदपत्रे / प्रमाणपत्रे  जोडणे  आवश्यक आहे.पूर्ण भरलेला अर्ज,
प्रतिज्ञापत्र (स्वयंसाक्षांकित),नोंदणी  प्रमाणपत्राची सत्यप्रत,पी आ कार्ड /   गाव नमुना सातबारा,उतारा / भाडे पावती/ दानपत्र /वक्फनामा,२ सदस्यांची यादी,ट्रस्ट डीडची सत्यप्रत,
धर्मादाय आयुक्ताकडून प्राप्त अनुसूची    किंवा फेरफार अहवालाची प्रत,
वार्षिक  अहवाल ( लगतच्या मागील  चारपैकी 3 वर्षाचे )अंदाजपत्रक  (बांधकामाकरीता  मागणी  केली  असल्यास),पटसंख्येचा दाखला वय  ६ ते १२ वयोगटातील विद्यार्थी संख्या, वय १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थी संख्या,शिक्षकांची संख्या व मानधन -
 डीएड आणि बीएड शिक्षकांची संख्या,आगावू पावती,दरपत्रकाची प्रत,इमारतीचे छायाचित्र,SPQEM  योजनेचा  लाभ  घेतला आहे किंवा नाही,मागणीची एकूण रक्कम  व सुविधांचे स्वरुप,या अगोदर घेतलेल्या  अनुदानाचा तपशील,उपयोगिता  प्रमाणपत्रे आदी.कागदपत्रे सोबत जोडावी.

Comments