चना खरेदीची अंतिम मुदत 11 जून शनिवार व रविवारी सुध्दा खरेदी केंद्र सुरु राहणार
- Get link
- X
- Other Apps
चना खरेदीची अंतिम मुदत 11 जून
शनिवार व रविवारी सुध्दा खरेदी केंद्र सुरु राहणार
वाशिम, दि. 07 (जिमाका) : केंद्र शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने रब्बी हंगाम 2022-23 या वर्षात जिल्हयात 8 नोडल एजन्सीमार्फत वाढीव चना उदिष्टाची खरेदी सुरु आहे. यापूर्वी शासनाचे 22 मे व 31 मे 2023 रोजीच्या आदेशातील दिलेल्या नियम व अटीनुसार खरेदी सुरु होती. मात्र शासनाचे 5 जून 2023 च्या आदेशानुसार नियमामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याकरीता शेतकऱ्यांच्या चालू हंगामातील 7/12 उतारावरील पिकपेरा क्षेत्रानुसार जेवढा माल (चना) उत्पादकतेनुसार विक्री होत असेल, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी माल (चना) खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा. यापुर्वी दिलेले 100 क्विंटलची अट शिथिल करण्यात आलेली आहे. खरेदीसाठी 4 दिवस शिल्लक असल्याने व खरेदीची अंतिम मुदत 11 जून 2023 पर्यंत असल्याने येत्या शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील खरेदी केंद्र सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून जावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment