20 कोतवाल पदांसाठी 16 जूनला आरक्षण सोडत


20 कोतवाल पदांसाठी 16 जूनला आरक्षण सोडत 

वाशिम दि.15 (जिमाका) वाशिम तालुक्यातील 20 तलाठी साझ्यावर कोतवालाची रिक्त पदे निश्चित केलेल्या आरक्षणानुसार भरण्यात येणार आहे. त्यासाठी 16 जुन 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता तहसील कार्यालय, वाशीम येथे आरक्षण सोडत होणार आहे.साझ्यानिहाय सर्वसाधारण, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती ब, तसेच भटक्या जमाती ड प्रवर्गाचे आरक्षण व सर्व प्रवर्गाच्या आरक्षणाकरीता साझ्यातील कोतवालांचे प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
       गोदेश्वर, वाशिम भाग -1,पारडी (टकमोर), पिंपळगाव,राजगाव, देवठाणा(बु),उकळी( पेन),तोंडगाव, तांदळी (बु ),जयपुर,सापळी, केकतउमरा,टो,कोकलगाव,खंडाळा (खुर्द ),अडोळी,कोंढाळा(झांबरे), तोरणाळा,बाभूळगाव व फाळेगाव ( थेट) येथील तलाठी साझ्यातील रिक्त असलेल्या कोतवाल पदांसाठी आरक्षणात सोडत होणार आहे.या सोडतीकरीता उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी 16 जून रोजी दुपारी 3.30 वाजता तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे.असे तहसीलदार वाशिम यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे