जिल्हा ग्रंथालयात कायदेविषयक शिबीर संपन्न




जिल्हा ग्रंथालयात

कायदेविषयक शिबीर संपन्न

        वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त वतीने कॉमन मिनीमम प्रोग्रामअंतर्गत 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी अन्न सुरक्षा कायदा या विषयावर, सहाय्यक लोक अभिरक्षक अतुल पंचवाटकर यांनी मुलांचे शिक्षणाचे अधिकार, लोक सहाय्यक अभिरक्षक शुभांगी खडसे यांनी मानवी तस्करी, सहाय्यक लोक अभिरक्षक हेमंत इंगोले यांनी अंमली पदार्थ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुख्य लोक अभिरक्षक श्री. शेळके यांनी मानले. शिबीराला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश