लाभार्थ्यांनी योजनांच्या लाभातून जीवनमान उंचावावे -आमदार लखन मलिक‘ शासन आपल्या दारी ’ उपक्रमाचे उदघाटन


लाभार्थ्यांनी योजनांच्या लाभातून जीवनमान उंचावावे

                                                                  -आमदार लखन मलिक

‘ शासन आपल्या दारी ’ उपक्रमाचे उदघाटन

       वाशिम, दि. 08 (जिमाका) :  " शासन आपल्या दारी " हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविध विभागाच्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.  राज्यात हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाथार्थ्यांनी या आयोजित शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे. असे आवाहन आमदार लखन मलिक यांनी केले.

          आज 8 जून रोजी वाशिम नगर परिषद येथील सभागृहात " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटक म्हणून आ.मलिक बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी तथा या उपक्रमाचे राज्य समन्वयक कैलास देवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक, वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पुजारी, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, गटविकास अधिकारी प्रफुल तोतेवार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रफिक शेख, तालुका अध्यक्ष प्रकाश महाल्ले यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

          श्री. देवरे म्हणाले, नागरीकांच्या कल्याणासाठी व त्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी शासनाचे विविध विभाग कार्यरत आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याकरीता प्रशासन मागील दोन महिन्यापासून तयारी करत आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना योजनांची माहिती नसल्यामुळे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. याच उद्देशाने शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. एकाच छताखाली योजनेचा अर्ज करुन नागरीकांना प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांनी योजनांची माहिती करून घ्यावी व लाभासाठी अर्ज करावा.असे त्यांनी यावेळी सांगितले.

          श्री.मालठाणे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजन केले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा याकरीता आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज शुभारंभ करण्यात आला आहे. असेच कार्यक्रम यापुढे तालुकास्तरावरसुध्दा घेण्यात येणार आहे. जिल्हयातील प्रत्येक नागरीकांना विविध विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

          " शासन आपल्या दारी " या उपक्रमातंर्गत आयोजित या शिबीरात तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेकडून 20 लाभार्थ्यांना, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशिम यांचेकडून 30 लाभार्थी, महिला बचत गटाचे 10 लाभार्थी, नगर परिषदेचे जन्म व मृत्यू विभाग 9 लाभार्थी, पुरवठा विभागाकडून 90 लाभार्थी, आपले सरकार सेवा केंद्र 40 लाभार्थी, सह जिल्हा निबंधक वाशिम कार्यालयाकडून 15 लाभार्थी, संजय गांधी योजनेचे 21 लाभार्थी, सेतू विभाग 82 लाभार्थी, जलसंपदा विभाग वाशिम 15 लाभार्थी, अभिलेख शाखा तहसिल कार्यालय, वाशिम 35 लाभार्थी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तहसिल कार्यालय वाशिम 5 लाभार्थी महावितरण विभाग 17 लाभार्थी, आरोग्य विभाग 27 लाभार्थी, राज्य परिवहन महामंडळ वाशिम आगार 1 लाभार्थी, सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून 36 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

          यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

          शिबीरात शासनाच्या विविध विभागाच्या व महिला बचतगटाचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक तहसिलदार श्री. मालठाणे यांनी केले. संचालन अमोल काटेकर यांनी तर आभार तहसिल कार्यालयाचे माधव शिंदे यांनी मानले. शिबीराला वाशिम तालुक्यातील लाभार्थी, नागरीक व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे