मोपच्या शिबिरातून 1820 लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा लाभ


मोपच्या शिबिरातून 1820 
लाभार्थ्यांना मिळाला योजनांचा लाभ

वाशिम दि.27 (जिमाका) रिसोड तालुक्यातील मोप येथे आज " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मोप मंडळात येणाऱ्या गावातील विविध योजनेच्या 1820 लाभार्थ्यांना लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमित झनक,जिल्हा परिषद सदस्य अमित खडसे,पंचायत समिती सभापती श्रीमती केशर हाडे,उपसभापती सुवर्णा नरवाडे,महादेवराव ठाकरे , शिवाजीराव खानझोडे,बबनराव गारडे,डॉ सिंग,सचिन इप्पर,खुशाल लांडे,विस्तार अधिकारी श्री.खिल्लारे साहेब,श्री. कोकाटे,श्री.देशमुख यांची उपस्थिती होती.
     आमदार श्री.झनक म्हणाले, 31 ऑगस्टपर्यंत या उपक्रमाची मुदत असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
             श्रीमती तेजनकर म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक विभागाने शेवटच्या घटकापर्यंत पोहचून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा.त्यासाठी प्रशासनाची लागेल ती मदत देऊ असे त्या म्हणाल्या.
         मोप मंडळातील सर्व गावाचे पोलिस पाटील,सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक,कृषी सहायक, आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेवक/सेवीका,कोतवाल,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,गटसचिव,रास्त भाव दुकानदार यांची देखील उपस्थिती होती.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी श्री.जावळे यांनी,संचालन तलाठी गौरी काष्टे यांनी केले. उपस्थितांचे आभार तलाठी कैलास धांडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोप मंडळातील मंडळ अधिकारी,तलाठी व कोतवाल यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे