वाईगौळ आश्रमशाळा प्रकरण चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार होणार कारवाई
- Get link
- X
- Other Apps
वाईगौळ आश्रमशाळा प्रकरण
चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार होणार कारवाई
वाशिम, दि. 30 (जिमाका) : मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील तपस्वी काशिनाथ बाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या व्यवस्थापन, तेथील सोयीसुविधा आणि शासन निधीचा अपहार झाल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन समाज कल्याण विभागाने चौकशीसाठी पाच सदस्य समिती गठित केली आहे. समितीच्या चौकशीचा स्वयं स्पष्ट अहवाल प्राप्त होताच दोषींवर नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment