शासन आपल्या दारी :घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान




शासन आपल्या दारी

घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियान

          वाशिम, दि. 05 (जिमाका) : रिसोड तालक्यातील ज्या शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका फाटलेल्या असतील, वापरण्या योग्य नसतील किंवा गहाळ झाल्या असतील. अशा शिधापत्रिकाधारकांना दुय्यम शिधापत्रिका आवश्यक असल्यास संबंधित गावचे रास्तभाव दुकानदार यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज भरावा. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जसे विहीत नमुन्यात अर्ज, जुन्या शिधापत्रिकाची छायांकीत प्रत, शिधापत्रिकामधील सर्व लाभार्थ्याचे आधार कार्डची छायांकीत प्रत जमा करण्यात यावी. जेणेकरुन संबंधित शिधापत्रिकाधारकास दुय्यम शिधापत्रिका घरपोच देण्यात येतील. तरी शासन आपल्या दारी या नाविन्यपुर्ण योजनेतून राबविण्यात येणाऱ्या या घरपोच दुय्यम शिधापत्रिका अभियानाचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन रिसोड तहसिलदार यांनी केले आहे.


*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर