अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी
30 जूनपर्यंत मुदतवाढ
वाशिम, दि. 22 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता अभियांत्रिकी पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १ जुनपासून २०२३ सुरु झाली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रीयेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. २१ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. परंतु प्रवेश प्रक्रीयेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे काही विद्यार्थ्याकडे अद्यापही उपलब्ध नसल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी प्रवेश प्रक्रियेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पॉलीटेक्निक प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये ई स्क्रूटिनी व फिजिकल स्क्रूटिनी असे दोन पर्याय उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जून व अंतिम गुणवत्ता यादी ७ जूनला २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे एकूण 6 शाखा असून प्रवेश प्रक्रिया व विविध शाखांची माहिती, महत्व तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे इ. माहितीसाठी समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन नोंदणी करावी. असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. बी.जी. गवलवाड यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment