आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
- Get link
- X
- Other Apps
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
वाशिम दि. 21 (जिमाका) आंतरराष्ट्रीय योग दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व विविध योग संघटनेच्या संयुक्त वतीने नववा आंतरराष्ट्रीय योग दिन आज 21 जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.वाटाणे लॉन,वाशिम येथे यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार ऍड.किरणराव सरनाईक,माजी आमदार विजयराव जाधव, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विजय काळबांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे व जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी उपस्थितांना योग प्रतिज्ञा दिली.
आयुष विभागाच्या योग थेरपिस्ट तेजस्विनी माणिकराव यांच्यासह आशिष जामकर, दीपक पाचरणे,निखिल देशमुख, ज्योती खोडे, वेदिका नायक व विक्रांता आहाळणे यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांकडून योग करून घेतले.
चलन क्रीयेने योगाची सुरुवात झाली.गिव्हा,कटी व घुटना संचलन,मक्रासन,भुजंगासन, सेव्हासन, सेतुबंधासन हे पोटावरील आसन, ताडासन, पादहस्तासन, त्रिकोणासन व अर्थचक्रासन हे उभे आसन, सेतूबंधासन,उत्तनपादासन, हलासन,पवनमुक्तासन व शवासन हे पाठीवरील आसने,दंडासन,भद्रासन, बंदकोनासन,वज्रासन,उष्टासन, शशकासन, मंडूकासन व वक्रासन ही बैठी आसने, कपालभारती, नाडीशोधन,भ्रामरी प्राणायाम आणि शेवटी शांतीपाठाने योग कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी मारुती सोनकांबळे, संतोष फुफाटे,शुभम कंकाळ, श्री कलीम, पुष्पलता अफूने,व्यंकटेश योग अभ्यासिका, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, कायाकल्प फिटनेस सेंटर,ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट शोतोकॉम कराटे असोसिएशन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हीग, मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि विविध योग संघटनांनी सहकार्य केले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी, विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील व्यक्ती, स्काऊट गाईड आणि राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी या योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment