8 जून रोजी वाशिम येथे फेरीवाल्यांसाठी कर्ज मेळावा
- Get link
- X
- Other Apps
8 जून रोजी वाशिम येथे
फेरीवाल्यांसाठी कर्ज मेळावा
वाशिम, दि. 07 (जिमाका) : वाशिम शहरातील सर्व फेरीवाल्यांकरीता नगर परिषद, वाशिमच्या वतीने पीएम स्वनिधी व शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत नगर परिषद वाशिम येथे 8 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान कर्ज मेळावा आयोजित केला आहे. ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल अपद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे, असे सर्व लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात कर्जासाठी अर्ज करता येईल. अर्ज ऑनलाईन भरून बँकेमार्फत लाभ घ्यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कॉमन सर्व्हीस सेंटर आणि नगर परिषद वाशिम अंतर्गत शहर उपजीविका केंद्राच्या वतीने कर्जासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फेरीवाल्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरीता कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा. कर्ज अर्ज मंजूरसुद्धा मेळाव्याच्या दिवशी करण्यात येणार आहे. यापूर्वी बँकेमध्ये अर्ज केला असल्यास तो बँकेकडे प्रलंबित असल्यास अर्ज केलेल्या अर्जाची एक प्रत बँकेत सादर केलेली प्रत इच्छुक लाभार्थ्याने सोबत घेऊन शिबीराला यावे. नवीन अर्ज भरण्याची सुविधा असून अर्ज भरून आपली नोंदणी करावी.
ज्या लाभार्थ्याचे कर्ज वाटप झाले आहे त्यांनी क्युआर कोड व डिजिटल साधनाच्या माध्यमातून व्यवहार करावे. फोनपे, गूगल पे यांचा वापर करून डिजिटल साधनाच वापर करावा. कॅशबॅकचा लाभ मिळवून घ्यावा. आपल्या बँकेमार्फत क्यूआर कोड उपलब्ध करून घ्यावे.
वाशिम शहरातील जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ज्या लाभार्थानी मागील वर्षी १० हजार रुपये कर्ज योजनेचा लाभ घेऊन सुरळीत परतफेड केली आहे. त्यांनी पहिले कर्ज नील केल्याचा दाखला घेऊन २० हजार रुपये कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा. ज्यांनी अर्ज भरला असेल तो बँकेकडे प्रलंबित असल्यास सोबत घेऊन यावा. बँक व्यवस्थापक यांच्या कार्यालयात सादर केलेला असल्यास त्या अर्जाची प्रत सोबत घेऊन यावी. नवीन कर्जासाठी अर्ज करणारे लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे सोबत घेऊन यावे. आधार संलग्न मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, फेरीव्यवसाय फोटो, नगर पालिकेची बैठक पावती, सर्व्हेक्षण झाल्याची पोच पावती इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा. असे आवाहन वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment