सीईओ श्रीमती पंत यांनी केली पाणी पुरवठा योजनांची पाहणी
- Get link
- X
- Other Apps
सीईओ श्रीमती पंत यांनी केली
पाणी पुरवठा योजनांची पाहणी
वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतीत असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी ७ जुन रोजी केली. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत वैयक्तीक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिवस गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मंजुर नळ पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत.
श्रीमती पंत यांनी मौजे सायखेडा येथील नळ पाणी पुरवठा योजनेवरील इलेक्ट्रोक्लोरीनेशन युनीट व प्रगतीत असलेल्या उद्भव विहीर बांधकामाची पाहणी केली. मौजे धानोरा (खु.) येथील नळ पाणी पुरवठा योजना उद्भव विहीर कामाची व ५० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच मौजे नांदगाव येथील प्रगतीत असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील ४५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची पाहणी श्रीमती पंत यांनी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, उपविभागीय अभियंता श्री. गिरी व ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. पाहणी दरम्यान श्रीमती पंत यांनी योजनेची कामे विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण करून ५५ लिटर प्रती दिन पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment