खेर्डा (बु.) शिबीरात 353 लाभार्थी लाभान्वीत



खेर्डा (बु.) शिबीरात 353 लाभार्थी लाभान्वीत

        वाशिम, दि. 30 (जिमाका) :  शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 28 जून रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) येथील संत केशरमाता आश्रम सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध योजनेच्या 353 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती अशोक डोंगरदिवे व गटविकास अधिकारी शालिकराम पडघान यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसिलदार विकास शिंदे होते.

            या शिबीरात संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, शिधापत्रिका, विविध दाखले व सलोखा योजनेच्या 113 लाभार्थ्यांना, दिव्यांग मदत वाटप, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी वाटप, बचतगट कर्ज वाटप, शिलाई मशिन, शिक्षण विभागाकडून गुणगौरव प्रमाणपत्र, बालविकास सेवा योजना व इतर योजनांच्या एकूण 117 लाभार्थ्यांना, आरोग्य विभागाअंतर्गत आभा कार्ड, गोल्ड कार्ड, एनसीडी, जननी सुरक्षा योजना अशा 30 लाभार्थ्यांना व 15 व्यक्तींची आरोग्य तपासणी, कृषी विभागाकडून बियाणे परवाना, ट्रेलर सेट, कांदा चाळ व रोटावेटर अशा एकूण 353 लाभार्थ्यांना ‍विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

           या कार्यक्रमाला ग्रामपंचायत खेर्डा (बु.), शिवाणी (बु.), महागांव व पारवा कोहर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजस्व मंडळाचे मंडळ अधिकारी गोवर्धन मनवर, तलाठी जी.जी. पवार, शैलेश घोगरे, रामकृष्ण कोकाटे, काशिबाई हेंबाडे व रुपाली धोटे यांच्यासह या राजस्व मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशा सेविका व इतर विभागाचे कर्मचारी तसेच कोतवाल यांच्यासह विविध गावचे नागरीक व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

            यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबीरात महसूल, पंचायत, कृषी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, वन विभाग, विज वितरण व अन्य विभागाचे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. ग्रामस्थांनी व लाभार्थ्यांनी विविध स्टॉलला भेट देवून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक तलाठी काशिबाई हेंबाडे यांनी, संचालन तलाठी राहूल वरघट यांनी तर उपस्थितांचे आभार तलाठी शैलेश घोगरे यांनी मानले.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे