रिसोड तालुक्यातील 19 तलाव गाळमुक्तीकडे पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी 625 शेतकऱ्यांचा पुढाकार 29 हजार ब्रास गाळ टाकला शेतात


रिसोड तालुक्यातील 19 तलाव गाळमुक्तीकडे 

पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी 625 शेतकऱ्यांचा पुढाकार  

29 हजार ब्रास गाळ टाकला शेतात 

वाशिम दि.10 (जिमाका) शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार या अभियानाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. भारतीय जैन संघटनेने या अभियानाला मोठे पाठबळ आहे. रिसोड तालुक्यातील 19 तलावातील गाळ काढण्यास जिल्हा प्रशासन व जलसंधारण विभागाच्या मार्गदर्शनात 625 शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून आतापर्यंत 29 हजार 839 ब्रास गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकल्याने निश्चितच या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास या अभियानाचा मोलाचा वाटा राहणार आहे.तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ आपल्या शेतात टाकावा यासाठी तहसीलदार श्रीमती तेजनकर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे." शासन आपल्या दारी " या उपक्रमातंर्गत जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्याचे काम करण्यात येत आहे.या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमातंर्गत करण्यात येत आहे.
           जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे.इथली बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते.जिल्ह्यात सिंचन प्रकल्पही मोजकेच आहेत. हे प्रकल्प जुने असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.राज्य सरकारने सुरू केलेल्या " गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार " योजनेमुळे जिल्ह्यातील या सिंचन प्रकल्पांना संजीवनी मिळत आहे.या प्रकल्पातील गाळ मोठ्या संख्येने शेतकरी शेतात टाकत असल्यामुळे शेतीची पोत सुधारण्यास मदत तर होणारच आहे, सोबतच पिकांची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास या अभियानाचा हातभार लागणार आहे.शेतीचे उत्पन्न वाढणार असल्याने शेतकऱ्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
      रिसोड तालुक्यातील कुकसा तलावातून 12000 ब्रास,केनवड तलाव - 2200 ब्रास,जवळा तलाव - 6400 ब्रास,भरजहांगीर तलाव - 800 ब्रास,पाचंबा तलाव -200 ब्रास,एकलासपूर तलाव -2500 ब्रास, मांगवाडी -190 ब्रास, पिंगलाक्षी तलाव,रिसोड- 1649 ब्रास,पळसखेड तलाव -700 ब्रास, सवड-300 ब्रास,घोन्सर तलाव - 500 ब्रास, पुरडा तलाव-200 ब्रास, हराळ तलाव -150 ब्रास,चिखली तलावातून 250 ब्रास,मोहजा इंगोले लोणी -150 ब्रास,व्याड तलाव -900 ब्रास,गोवर्धन तलाव -250 ब्रास गोंढाळा तलाव -200 ब्रास आणि लोणी तलावातून 300 ब्रास गाळ असा एकूण 29 हजार 839 ब्रास गाळ 625 शेतकऱ्यांनी तलावातून काढून शेतात टाकल्याने शेतीतील पिकांचे उत्पन्न वाढण्यास या अभियानाची मोठी मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे