जिल्हास्तरीय कृषी निविष्‍ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न




जिल्हास्तरीय कृषी निविष्‍ठा सनियंत्रण समिती सभा संपन्न

        वाशिम, दि. 21 (जिमाका) : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली 20 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात संपन्न झाली. सभेमध्ये रासायनिक खते, बी-बियाणे, शेतकऱ्यांना योग्य दरात व गुणवत्तापुर्ण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

            जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन एस. यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. जिल्हयात उपलब्ध रासायनिक खतांचा व बी-बियाण्यांचा साठा याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. खरीप हंगामाच्या दृष्टीने पुढील काळात आवश्यक असणाऱ्या निविष्ठा योग्य वेळेत पुरवठा होण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश कृषी विभागाला यावेळी दिले. शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्यास त्याची घरगुती पध्दतीने उगवण क्षमता तपासणी करुन पेरणी करावी आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही श्री. षण्मुगराजन यांनी दिल्या.

            कृषी निविष्ठा विक्रेते हे रासानिक खते व बियाणे जास्त दराने विक्री करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याअनुषंगाने कृषी केंद्रांच्या आकस्मीक तपासण्या करण्यात याव्या. असे निर्देशही श्री. षण्मुगराजन यांनी दिले. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे, प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, मोहिम अधिकारी चंदु भागडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किशोर सोनटक्के, विस्तार अधिकारी गजेंद्र चिंतावार, सर्व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सर्व कृषी अधिकारी, विविध रासायनिक खत कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी व बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे