शासन आपल्या दारी : हिवरा (लाहे) येथील शिबीरात 318 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ



शासन आपल्या दारी

हिवरा (लाहे) येथील शिबीरात 318 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

वाशिम, दि. 26 (जिमाका) : ‘ शासन आपल्या दारी ’ उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील हिवरा (लाहे) येथील रामसभा संस्थान सभागृहात आज 26 जून रोजी आयोजित शिबीरात हिवरा (लाहे) महसूल मंडळात येणाऱ्या गावातील विविध योजनांच्या 318 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
           अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार विनोद हरणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वर्षा लाहे, उपसरपंच विलास मनवर, मोहगव्हाणचे सरपंच भिमराव अवताडे, हिवरा (लाहे) चे पोलीस पाटील देविदास कावरे, सुधीर लाड व मंडळ कृषी अधिकारी रवी जटाळे यांची उपस्थिती होती.
           यावेळी श्री. हरणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबीरात महसूल विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दुय्यम शिधापत्रिका तसेच नवीन शिधापत्रिका, विविध दाखले, सलोखा योजनेच्या १५७ लाभार्थ्यांना, पंचायत विभागाअंतर्गत दिव्यांगाना मदत, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी, बचत गट कर्ज, शिलाई मशिन, शिक्षण विभागाकडून गुणगौरव प्रमाणपत्र, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच अन्य योजना, आरोग्य विभागाकडून आभा कार्ड, गोल्डन कार्ड, एनसीडी, जननी सुरक्षा योजना, कृषी विभागाकडून बियाणे परवाना, स्पिंक्लर सेट, कांदा चाळ व रोटावेटर अशा विविध येाजनांच्या ३१८ लाभार्थ्यांना या शिबीरात लाभ देण्यात आला.

शिबीरात महसूल, पंचायत, आरोग्य, कृषी, वीज वितरण, शिक्षण, पशुसंवर्धन, एकात्मीक बाल व महिला विकास, वन तसेच इतर विभागांचे स्टॉल लावून नागरीकांना व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहीती देण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असुन ११२ व्यक्तीनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

यावेळी मंडळ अधिकारी विजय अवचार, मंडळातील तलाठी रविंद्र कोरडे, संजय सावरकर, अनिल बोरसे, किशोर महाजन, वृषाली नेमाने, नेहा खंडारे व ग्रामसेवक श्री. मोहाळे, श्री. बेलुकर, श्री. उपाध्ये, श्री. राऊत तसेच तालुक्यातील इतर मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, शिक्षक, पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल, अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर, व हिवरा (लाहे) मंडळातील नागरीक व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंगणवाडी सेवीका लता बेलसरे यांनी केले. संचालन तलाठी राहूल वरघट यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक श्री. उपाध्ये यांनी मानले.
                                                                                                                                            *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे