स्वनिधी ते समृध्दी अंतर्गत 8 जून रोजी शिबीराचे आयोजन फेरीवाल्यांनी लाभ घेण्याचे आवाहन




स्वनिधी ते समृध्दी अंतर्गत

8 जून रोजी शिबीराचे आयोजन

फेरीवाल्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

      वाशिम, दि. 07 (जिमाका) : वाशीम शहरातील सर्व फेरीवाल्यांसाठी "स्वनिधी ते समृद्धी" अंतर्गत नगर परिषद वाशीमच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत कर्ज मिळालेल्या लाभार्थी व त्यांचे कुटूंबियांकरीता केंद्र शासनाच्या 8 योजनांचा लाभ मिळण्याकरीता स्वनिधी ते समृद्धी अंतर्गत 8 जून रोजी सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबीराला सर्व बँक व्यवस्थापक व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहे. तरी वाशिम शहरातील फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

          कर्ज मिळालेल्या लाभार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना विविध विभागामार्फत पुढील योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या कार्यालयामार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, कामगार विभागाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार व प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, आरोग्य विभागाच्या जननी सुरक्षा योजना, महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत वन नेशन वन रेशनकार्ड या केंद्र शासनाच्या योजनांचे पथविक्रेते व त्यांच्या कुटुंब सदस्यांकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

         पात्र व ज्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी ते समृद्धी योजनेचा ऑनलाईन सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे असे सर्व पथविक्रेते व त्यांच्या कुटूंब सदस्यांनी आपले कागदपत्र घेऊन वरील ठिकाणी उपस्थित राहावे. सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण ज्यांचे झाले नाही, त्यांनी तात्काळ सर्व्हेक्षण पूर्ण करून घ्यावे. लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे सोबत घेऊन शिबीराला यावे. आधार संलग्न मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क करावा. असे आवाहन मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे