24 जून रोजी वाशिम येथे महारोजगार मेळावा





24 जून रोजी वाशिम येथे

महारोजगार मेळावा

       वाशिम, दि. 23 (जिमाका) :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आणि श्री. शिवाजी विद्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा श्री. शिवाजी विद्यालय, मेन रोड, वाशिम येथे २४ जुन २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.
          मेळाव्याचे उदघाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे करतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. उपस्थित हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावनाताई गवळी, खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य सर्वश्री ॲड किरणराव सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी व आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती राहणार आहे. तेंव्हा जास्तीत जास्त युवक युवतींनी या महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एन. जयस्वाल व श्री. शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे