अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना 1 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित



अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

1 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. वाशिम जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता थेट कर्ज योजनेचे ४० कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट आहे. थेट कर्ज
योजनेअंतर्गत 1 लक्ष रुपयात महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये व ५ टक्के लाभार्थी सहभाग ५ हजार रुपये व उर्वरीत ८५ हजार रुपये महामंडळाचे कर्ज आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव जिल्हयातील मातंग समाजातील १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदारांकडून मागविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत वितरीत केले जाणार आहे. वितरीत केलेले व परिपुर्ण असलेले अर्ज 1 ऑगस्ट 2023 पर्यंत स्विकारले जातील.
          जिल्हयातील मांग/मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय १८ ते ५० असावे. वार्षिक उत्पन्न ३ लक्ष रुपयापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत जिल्हा कार्यालयात स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहुन दाखल करावेत. त्रयस्थ/ मध्यस्थामार्फत योजनेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाही.
         योजनेच्या लाभासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायाबाबत जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल, ग्रामपंचायत/ नगरपालिका/ यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉपअॅक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणीक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान ५०० असावा, अर्जदाराचे आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे थेट कर्ज योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाची लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून पात्र अर्जदाराची उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठठयाव्दारे (लॉटरी पध्दतीने) निवड करण्यात येईल. निवड झालेल्या अर्जदाराची वैधानिक दस्तऐवजाची पुर्तता (दोन जामीनदार) झाल्यानंतर कर्जाचे वितरण करण्यात येईल. या योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे सादर करावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे.एम. गाभणे यांनी केले आहे.

*******





Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर