परदेश शिक्षण शिष्यवृत्ती 30 जूनपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
परदेश शिक्षण शिष्यवृत्ती
30 जूनपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 26 (जिमाका) : अनुसुचित जमातीच्या 10 विदयार्थांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले आहे. विहित नमून्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. 30 जून 2023 पर्यंत विहित नमून्यातील अर्ज परीपूर्ण भरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या सुचना फलकावर उपलब्ध आहे. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment