प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा




प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत

सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा

      वाशिम, दि. 09 (जिमाका) :  जिल्हयातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेतील सभासद, मत्स्यव्यवसायातील कामगार, मत्स्यवर्धक तसेच मत्स्यव्यवसाय व मत्स्यव्यवसायाशी निगडीत बाबींमध्ये प्रत्यक्ष संबंध असलेले व्यक्ती यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (अपघात गटविमा योजना) या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबाबतची माहिती विहीत प्रपत्रात सादर करावी. तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा (अपघात गटविमा योजना) जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायाशी निगडीत व्यक्तींनी लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे