आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजनाबाबत सभा संपन्न 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस




आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजनाबाबत सभा संपन्न

21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस

       वाशिम, दि. 19 (जिमाका) :  २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने 21 जून 2023 रोजी वाशिम येथील वाटाणे लॉन येथे करण्यात येणार आहे. योग दिन आयोजनाच्या निमित्ताने आज 19 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा सभा संपन्न झाली.
          या सभेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, आयुष विभागाच्या योग थेरपिस्ट तेजस्विनी माणिकराव, पतंजली योग समितीचे डॉ. भगवंत वानखेडे, विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जोशी, समाज कल्याण विभागाचे श्री. निमन, महिला पतंजली योग समितीच्या दिपा वानखेडे, व्यंकटेश योगाभ्यासिकाच्या संयोजिका पुष्पलता अफुणे, सुशिल अग्रवाल, आर्ट ऑफ लिवींगचे विजय चव्हाण, एनसीसीचे शिक्षक श्री. काळे, योग शिक्षक दिपक येकाडे, सुखदेव राजगुरु, पुरुषोत्तम दुरतकर, संजय लहाने, अशिष जांबकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, जिल्हा क्रीडा कार्यालयातील शुभम कंकाळ व दिपक भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

           जिल्हास्तरीय योग कार्यक्रम हा जिल्हा प्रशासनाचा मार्गदर्शनाखाली आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले. या योग कार्यक्रमाकरीता वाशिम येथील योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था, महसुल विभाग, पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभागातील तसेच विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी, पतंजली जिल्हा योग समिती, क्रीडा क्षेत्रातील युवक- युवती व खेळाडु यांच्या उपस्थितीत २१ जुन रोजी सकाळी ६.३० ते ७.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी वाटाणे लॉन, अकोला रोड वाशिम येथे सकाळी ६. ३० वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे