पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २६: उमरी व पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. काम मार्च २०२४ पर्यंत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शिखर समितीच्या बैठकीत सांगितले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री व वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते.
या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे काम सुरू असून मुख्य इमारतीचे काम पूण होत आले आहे. प्रकल्प दोन अंतर्गत समाधी परिसर बांधकाम, भाविकांसाठी सोयीसुविधा याबाबत वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.
बैठकीस वित्त (व्यय) विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.
००००
Comments
Post a Comment