26 जून रोजी सामाजिक न्याय दिवस




26 जून रोजी

सामाजिक न्याय दिवस

       वाशिम, दि. 23 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व सर्व नागरीकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 26 जून 2023 रोजी सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन या चौकातून समता दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे येऊन त्याठिकाणी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे