48 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड

48 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड 

वाशिम दि 16 (जिमाका) सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षात शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम येथे अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यामध्ये 48 विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली.
         उद्योगधंद्यांना उपयुक्त असे रोजगारक्षम विद्यार्थी घडवून त्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, वाशीम येथे एकूण सहा शाखा कार्यरत आहे.प्राचार्य डॉ.बी.जी गवलवाड व टीपीओ यु.आर तोष्णीवाल यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांकरीता कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये देशातील अग्रगण्य व नामांकित बजाज ऑटो व जी.ई इलेक्ट्रिकल प्रा.लि.या कंपन्यांनी कॅम्पस रिक्रुटमेंट प्रक्रिया राबविली. यामध्ये ऑटोमोबाईल,सिव्हील, मेकॅनिकल,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि माहिती व तंत्रज्ञान शाखेतील अंतिम वर्षात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
       विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, गुणवत्ता व प्रात्यक्षिक कौशल्य यावर आधारित 48 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मानधनासोबत मेडिक्लेम, ग्रुप एक्सीडेंट, पॉलिसी व कॅन्टीन सुविधा देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे