आमदार ऍड किरणराव सरनाईक यांची माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट

आमदार ऍड किरणराव सरनाईक यांची माविमच्या वस्तू विक्री प्रदर्शनाला भेट

वाशिम दि.27(जिमाका) सन 2001 पासून जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाची सुरुवात करून महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्हात  मोठया संख्येने महीला बचत गटांची स्थापना केली आहे.अनेक बचतगटाच्या महिला आज विविध छोटे छोटे उद्योग सुरू करून कुटुंबाला हातभार लावत आहे. कुटुंबाच्या अर्थकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.असे प्रतिपादन आमदार ऍड.किरणराव सरनाईक यांनी केले.
         रविवारी आमदार श्री.सरनाईक यांनी महिला विकास महामंडळाच्या वतीने विठ्ठलवाडी येथे आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला भेट दिली.भेटीदरम्यान ते बोलत होते. 
           माविमचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य असून यामुळे बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.माविमद्वारे  जिल्ह्यात सूरू असणारे  महिला सक्षमीकरणाचे कार्य खरोखर 
कौतुकास्पद असून माविमच्या कार्यास  आमदार सरनाईक यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 
    यावेळी श्री.के टी देशमुख,जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,कार्यक्रम अधिकारी  प्रांजली वसाके,गजु हतोलकर,राहुल मोकळे,आनंद काळे,अल्पसंख्याक लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक विजय वाहने,
वर्षा डाखोरे,अर्चना कोकणे,
प्रीती सावके,अमृता पवार,
कार्तिक तायडे,प्रशांत गोळे,जोत्सना ठाकरे,प्रदीप तायडे,अभिषेक माळेकर,नीती वाघमारे, स्वाती गवळी,  साधना शेजुळ,सविता सुतार,संगीता शेळके, प्रदीप देवकर,सागर विभुते, तेलगोटे,पट्टेबहादूर,संतोष मुखमाले, सीमा पाचपिल्ले,नंदकिशोर राठोड, नसीम मांजरे,सुनिता मनवर,उषा ठाकरे ,नंदा बयस,गीता आमटे,
विनय पडघान,जोत्सना पुरी,मिरा वाघमारे,वर्षा अंभोरे,प्रिती खडसे, प्रणिता भगत,प्रमोद गोरे,अरुण सुर्वे, खंडारे,शरद कांबळे,भारती चक्रनार, सुनिता सुर्वे,अविनाश इंगळे,
संघरत्न खीराडे यांची उपस्थिती होती.तसेच प्रदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या बचत गटातील महिला, खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे