३१ मार्चपर्यंत पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

३१ मार्चपर्यंत पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

वाशिम,दि.२८ (जिमाका) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने २९ मार्च ते ३१ मार्च पर्यत ऑनलाईन रोजगार
मेळावा आयोजित केला आहे.
              या रोजगार मेळाव्यामध्ये १) एलआयसी ऑफ इंडिया शाखा वाशिम २) परम स्किल्स ट्रेनिंग
इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद ३) पिपल ट्री व्हेंचर्स प्रायक्हेट लिमिटेड इत्यादी नामांकित
कंपन्या/उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छूक उमेदवाराना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.
       याकरीता १०वी,१२ वी, आय.टी.आय. फिटर/वेल्डर/टर्नर ट्रड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), इंजिनिअरींग डिप्लोमा इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून विविध प्रकारच्या पदनामांकरीता ५०
संख्येपेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना
याव्दारे प्राप्त होणार आहे.
        जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/ पुरुष उमेदवारांना
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक
पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे.ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उमेदवारांना त्यांचेकड़ील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधुन मेळाव्यात सहभागी होता
येईल. 
        रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया/ पध्दत खालीलप्रमाणे आहे.
www.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर Job Seeker वरील Forth Comming Pandit Dindayal Upadhyay Job Fairs या खाली View All वर क्लिक करून washim जिल्हा सिलेक्ट करुन सर्च करावे.नंतर
WASHIM ONLINE JOB FAIR-5 या नावाने रोजगार मेळावा दिसेल त्यासमोरील View More वर क्लिक करुन View Vacancies क्लिक करावे.त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे दिसतील.त्यासमोर APPLY करावे.त्यानंतर
 (Please login or register to apply the Jobfair vacancies other than Aurangabad
District Jobfair, Please close the next Pop up and then Login or Register) असा मेसेज दिसेल त्यानंतर OK करुन आपल्याकड़ील
www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा.
       काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांचे दुरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ मो.क्र. ९८५०९८३३५ / ८६६८२५६५०০ / ७८७५७९८६८४ वर संपर्क करावा.असे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे