माविमच्या प्रदर्शनातून 6 लक्ष रुपयांची विक्री जिल्हास्तरीय साहित्य विक्री व प्रदर्शनाचा समारोप


माविमच्या प्रदर्शनातून 6 लक्ष रुपयांची विक्री

जिल्हास्तरीय साहित्य विक्री व प्रदर्शनाचा समारोप

       वाशिम, दि. 28 (जिमाका) : बचत गटांच्या उत्पादनांना  बाजारपेठ मिळावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन 24 ते 27 मार्च 2023 दरम्यान विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे करण्यात आले.

            यामध्ये जिल्हातील विविध 48 बचतगटांनी सहभाग नोंदवत आपले उत्पादन विक्रीकरीता आणले होते. त्यांच्या उत्पादनास वाशिमकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बचतगटांतील महिलांद्वारा उत्पादित वस्तू विना केमिकल, पौष्टीक,रुचकर व आकर्षक असल्याने मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामध्ये मांडे, मटण, पुरण पोळी, कुरडया, पापड, शोभेच्या वस्तू आदी विविध पदार्थ व वस्तू होत्या. प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार यांची प्रमुख उपस्थि‍ती होती. मान्यवरांनी बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट देवून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले. यावेळी स्टॉलच्या महिलांना सहभागी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

            24 ते 27 मार्च दरम्यान आयोजित या प्रदर्शनामध्ये बचतगटांच्या विविध प्रकारच्या उत्पादीत साहित्यांची  6 लक्ष 36 हजार 800 रुपयांची विक्री झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातुन माविमच्या बचतगटांनी उत्पादीत केलेल्या मालाला एक चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली. समारोपप्रसंगी महिलांनी मनोगत व्यक्त करताना माविमद्वारे चांगली संधी उपलब्ध झाल्याचे सांगि‍तले. अशाच प्रकारच्या आणखी प्रदर्शनाचे आयोजन वेळोवेळी करावे अशी अपेक्षाही महिलांनी यावेळी व्यक्त केली. 

        माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहा.जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके,गजु हतोलाकर, राहुल मोकळे, आनंद काळे, गौरव नंदनवार,सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थि‍ती होती.

*******

                                                                         

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे