शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला दिन उत्साहात साजरा
शासकीय तंत्रनिकेतन येथे महिला दिन उत्साहात साजरा
वाशिम दि.16 (जिमाका) शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ बी. जी. गवलवाड होते. मार्गदर्शक म्हणून ऍड.सुचिता कुलकर्णी व ऍड.श्वेता खंडेलवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी ऍड.कुलकर्णी व ॲडव्होकेट खंडेलवाल यांनी उपस्थित विद्यार्थिनींना पोस्को ॲक्ट महिला संरक्षण विषयक अधिकार व कायदे तसेच सायबर क्राईम बाबत विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रम संस्थेतील निर्भया पथक समितीद्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला निर्भया पथक समिती अध्यक्ष मनीषा मोरे,सचिव कल्याणी चौधरी,डॉ. राजवेंद्र बिलोलीकर, श्रीमती रिता भंगाळे,श्रीमती रुख्मा अढाव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिमखाना उपाध्यक्ष राहुल महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment