थेट कर्ज योजना 9 मार्चला लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड
- Get link
- X
- Other Apps
थेट कर्ज योजना
9 मार्चला लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड
वाशिम, दि. 03 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये थेट योजनेअंतर्गत २६ डिसेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत एकुण ८३ कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी ६७ कर्ज मागणी अर्ज पात्र व १६ अर्ज अपात्र ठरले आहे. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी ५३ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे. या योजनेच्या २० कर्ज प्रकरणाचे उदिष्ट असून त्यापैकी १० पुरुष व १० महिला कर्ज मागणी अर्जाची लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनुसार लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वाकाटक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड लॉटरी पध्दतीने होणार आहे.
पात्र अर्जदाराची यादी महाममंडळाच्या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधीतांनी नोंद घ्यावी. तसेच जिल्हयातील अर्जदारांनी या बैठकीला उपस्थित राहावे. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment