शालेय विद्यार्थ्यांचे तंबाखूबाबत समुपदेशन करा -जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

 


शालेय विद्यार्थ्यांचे तंबाखूबाबत 

समुपदेशन करा

-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

 

वाशिम, दि. 12 (जिमाका) :  बालवयात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले तर आयुष्यभर विद्यार्थी त्याचे अनुकरण करतात. शालेय विद्यार्थी हा तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याबाबत शिक्षकांनी दक्ष राहून काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परीणामांची जाणीव करुन देवून त्यांच्या समुपदेशनाचे काम शिक्षकांनी करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केले.

आज 12 ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला सहायक पोलीस अधिक्षक संदीप भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षन्मुगराजन पुढे म्हणाले, जिल्हयात कोणत्याही शेतात तंबाखू पिकाचे उत्पादन घेण्यात येत असल्यास त्याची खात्री कृषी विभागाने करावी. शासकीय कार्यालयाच्या विविध इमारतीमध्ये पान, खर्रा व तंबाखू खाऊन मोठया प्रमाणात थुंकल्याने हया इमारती विद्रुप व अस्वच्छ दिसून येत आहे. यापुढे अशा शासकीय इमारतीत कोणीही धुम्रपान करणार नाही, याकडे लक्ष दयावे. धुम्रपान करतांना कुणी आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जिल्हयात कोटपा कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड म्हणाले, तंबाखूच्या दुष्परीणामाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हयातील शाळा व महाविद्यालये तंबाखूमुक्त राहील याकडे आपले लक्ष आहे. विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा- 2003 ची देखील जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदीचे पालनावर आपला भर असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. बैठकीत संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश