जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूकीत ६३.४५ टक्के मतदान

*जिल्हा परिषद आणि पंचायत* *समिती पोटनिवडणूकीत ६३.४५ टक्के मतदान*


• १९३ उमेदवारांचे भाग्य ईव्हिएममध्ये बंद


• २ लाख २२ हजार ८७१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


• वाशिम तालुक्यात सर्वाधिक मतदान


वाशिम दि.०५ (जिमाका) : वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूकीसाठी आज ५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. या निवडणूकीत ६३.४५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत २ लाख २२ हजार ८७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ गटासाठी ६९ आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १२४ उमेदवार अशा एकूण निवडणूक लढवित असलेल्या १९३ उमेदवारांचे भाग्य ईव्हिएम बंद झाले. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या पोटनिवडणूकीत एकूण २ लाख २२ हजार ८७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १ लाख २० हजार ५९७ पुरुष मतदार आणि १ लाख २ हजार २७३ स्त्री मतदारांचा तसेच १ तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. सर्वाधिक मतदान वाशिम तालुक्यात झाले. तालुक्यातील ४६ हजार ४९४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६८.३३ टक्के इतकी आहे. 

     जिल्हयातील सर्व सहा तालुक्यातील ५५९ मतदान केंद्रावर मतदान झाले. यामध्ये कारंजा तालुका- ६०, मानोरा तालुका- १०९, मंगरुळपीर तालुका- ९३, मालेगांव तालुका- ८३ रिसोड तालुका- १११ आणि वाशिम तालुका १०३ मतदान केंद्राचा यामध्ये समावेश आहे. 

          कारंजा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी ६ उमेदवार आणि पंचायत समितीच्या चार गणासाठी १८ उमेदवार निवडणूक लढवित आहे. एकूण ६० केंद्रावर या तालुक्यात मतदान झाले. यामध्ये ९ हजार २०५ स्त्री मतदार आणि ११ हजार १०९ पुरुष मतदार अशा एकूण २० हजार ३१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ५३.०३ आणि पुरुष मतदारांची टक्केवारी ५९.१० टक्के असून एकूण टक्केवारी ५६.१९ टक्के इतकी आहे.


       मानोरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी ११ उमेदवार आणि पंचायत समितीच्या चार गणासाठी २४ उमेदवार निवडणूक लढवित आहे. एकूण १०९ केंद्रावर या तालुक्यात निवडणूकीसाठी मतदान झाले. यामध्ये १७ हजार ७२५ स्त्री मतदार आणि २१ हजार १६३ पुरुष मतदार अशा एकूण ३८ हजार ८८८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ५६.३९ आणि पुरुष मतदारांची टक्केवारी ६०.४८ टक्के अशी एकूण ५८.५५ टक्के आहे.

 

       मंगरुळपीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी १३ उमेदवार आणि पंचायत समितीच्या चार गणासाठी १७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. या तालुक्यातील एकूण ९३ केंद्रावर मतदान झाले. यामध्ये १८ हजार ८५४ स्त्री मतदार आणि २१ हजार ९४० पुरुष व १ तृतीयपंथी मतदार अशा एकूण ४० हजार ७९५ मतदारांनी मतदान केले. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ६१.५७ टक्के तर पुरुष मतदारांची टक्केवारी ६५.६५ अशी एकूण ६३.७० टक्के आहे.


         मालेगांव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी ६ उमेदवार आणि पंचायत समितीच्या पाच गणासाठी १९ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहे. या तालुक्यातील एकूण ८३ केंद्रावर मतदान झाले. यामध्ये १३ हजार ९६३ स्त्री मतदार आणि १६ हजार ५१९ पुरुष मतदार अशा एकूण ३० हजार ४८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ६१.४३ आणि पुरुष मतदारांची टक्केवारी ६४.९२ अशी एकूण टक्केवारी ६३.२७ टक्के आहे.

 

         रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी १० उमेदवार आणि पंचायत समितीच्या पाच गणासाठी २२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. या तालुक्यातील एकूण १११ केंद्रावर मतदान झाले. यामध्ये २१ हजार २०९ स्त्री मतदार आणि २४ हजार ६८९ पुरुष मतदार अशा एकूण ४५ हजार ८९८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ६५.३२ आणि पुरुष मतदारांची टक्केवारी ६८.६९ अशी एकूण ६७.०९ टक्के आहे.


      वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी २३ उमेदवार आणि पंचायत समितीच्या पाच गणासाठी २४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे. या तालुक्यातील एकूण १०३ केंद्रावर मतदान झाले. यामध्ये २१ हजार ३१७ स्त्री मतदार आणि २५ हजार १७७ पुरुष मतदार अशा एकूण ४६ हजार ४९४ मतदारांनी मतदान केले. यामध्ये स्त्री मतदारांची टक्केवारी ६६.३४ आणि पुरुष मतदारांची टक्केवारी ७०.११ अशी एकूण ६८.३३ टक्के आहे.


        वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूकीत १ लाख २ हजार २७३ स्त्री मतदारांनी, १ लाख २० हजार ५९७ पुरुष मतदारांनी आणि १ तृतीयपंथी मतदार अशा एकूण २ लाख २२ हजार ८७१ मतदारांनी मतदान केले. स्त्री मतदारांची टक्केवारी ६१.३४ टक्के तर पुरुष मतदारांची टक्केवारी ६५.३६ टक्के आहे. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश