सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे-नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना मिळणार धान्य *परिमाण व दर निश्चित

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 
माहे-नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना मिळणार धान्य 
      *परिमाण व दर निश्चित

वाशिम दि.३०(जिमाका) - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील  शिधापत्रिकाधारकांना ई- पॉसद्वारे योजनानिहाय धान्याचे वितरण करण्यात येते. नोव्हेंबर २०२१ करीता जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना,एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरिता धान्य परिमाण आणि धान्याचे दर याप्रमाणे लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
     अंत्योदय अन्न योजना (प्रति कार्ड) -  १५ किलो गहू दोन रुपये प्रति किलो,२० किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो आणि एक किलो साखर वीस रुपये प्रति किलो. प्राधान्य योजना (प्रति लाभार्थी) - तीन किलो गहू दोन रुपये प्रति किलो, दोन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलोप्रमाणे. एपीएल शेतकरी योजना (प्रति व्यक्ती) - चार किलो गहू दोन रुपये प्रति किलो प्रमाणे, एक किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो,प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अर्थात अंत्योदय योजना (प्रति व्यक्ती ) - तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत आणि  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अर्थात प्राधान्य कुटुंब योजना (प्रति व्यक्ती) -  तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ  मोफत लाभार्थ्यांना मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी याची नोंद घ्यावी. असे जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश