लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
       -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. 

#मालेगाव येथे लसीकरण आढावा सभा 

वाशिम दि.१५(जिमाका) कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही.कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हाही येऊ शकते. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे तालुक्यातील पात्र व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले.
        14 ऑक्टोबर रोजी मालेगाव तहसील कार्यालय येथे कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना आयोजित सभेत श्री षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शोभा गोंडाळ,पंचायत समिती उपसभापती श्रीमती घोडे,तहसीलदार रवी काळे, गटविकास अधिकारी श्री खिल्लारे, तालुका आरोग्य अधिकारी बोरसे व नगर परिषदेचे मुख्यधिकारी डॉ.खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री.षण्मुगराजन पुढे म्हणाले, मालेगाव तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. जास्तीत जास्त तालुक्यातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. गावपातळीवरील काम करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांची भेट घेऊन, ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यास सांगावे. शहरी भागात सुद्धा नगरपालिकेने नियोजन करून जास्तीत जास्त लसीकरण करावे, असेही ते म्हणाले. 
             डॉ.आहेर यांनी मालेगाव तालुक्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राअंतर्गत करण्यात येत असलेल्या लसीकरण नियोजनाची माहिती दिली.यावेळी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी आढावा सभेनंतर शिरपूरजवळील गौडखेड येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश