जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती

 



जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून

हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती

वाशिम, दि. 27 (जिमाका) :  आज 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील एम.एस. डब्लु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रृण हत्या, हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. उपस्थितांना स्त्रीभ्रृण हत्या करणे गुन्हा आहे, विवाहीत स्त्रीचा छळ करु नये तसेच मुलगी शिकली तर कुटूंब शिकेल आणि कुटूंब शिकले तर समाज सुधारेल आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कार्याला मदत होईल असा प्रभावी संदेश या नाटिकेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थिताला दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे, न्या. पी.पी. देशपांडे, न्या. श्रीमती एस.व्ही. फुलबांधे, न्या. पी.एच. नेरकर, न्या. आर.पी. कुलकर्णी, इतर न्यायीक अधिकारी, डॉ. रचना तेहरा व समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. श्री. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायालयीन कर्मचारी व पक्षकारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. एस.पी. शिंदे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. माधुरी वायचाळ यांनी मानले.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश