लघुसिंचन योजना व जलसाठयांची प्रगणना 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करा-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.

लघुसिंचन योजना व जलसाठयांची प्रगणना 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करा-जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. 

वाशिम, दि. 11 (जिमाका) : भुपृष्ठाखालील आणि भुपृष्ठावरील ज्या जलसाठयांच्या वापरासाठी विहीरी, कुपनलिका तसेच 0 ते 2000 हेक्टर सिंचन क्षमतेच्या अनेक लघु सिंचन योजना आहे. या योजनांच्या आणि जलसाठयांच्या प्रगणनेचे काम 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण करा. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.

आज 11 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात लघु सिंचन योजनांची 6 वी प्रगणना आणि जलसाठयांची प्रगणना कार्यक्रम अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष अकोसकर, लघु पाटबंधारे विभाग कारंजाचे कार्यकारी अभियंता व्हि.आर. चौधरी, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती ए.आर. नानोटकर, उप कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सर्वश्री, एस.एस. फेरवानी, एस.पी. पिदडी, व्ही. बी. सपकाळ, पी.पी. शिंदे, एच.व्हि. वाघमारे, राजेश कोठेकर, पी.एस. गायकवाड,  एस.डी. कोरडे, प्रेम ठाकरे व उमेश देशमुख यांनी उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन पुढे म्हणाले, निर्धारीत वेळेत लघु सिंचन योजना व जलसाठयांची प्रगणना करण्यासाठी आवश्यक असेल तर मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. 2 हजार हेक्टर क्षमतेच्या लघुसिंचन प्रकल्पाचे मोबाईलवर संबंधित ॲप डाऊनलोड करुन ॲपच्या माध्यमातुन सिंचन योजनांचे व जलसाठयांचे जिओ टॅगींग करावे. विविध सहा प्रपत्रात माहिती संकलीत करुन संबंधित पोर्टलवर भरावी, असे ते म्हणाले.

श्री. अकोसकर महिती देतांना म्हणाले, केंद्र सरकारकडून राष्ट्रीयस्तरावर लघुसिंचन योजनांची 6 वी प्रगणना आणि जलसाठयांची प्रगणना करण्याच्या निर्देशानुसार हे काम करण्यात येत आहे. साध्या विहीरी, उथळ, मध्यम व खोल उपनलिकांच्या माध्यमातून भुपृष्ठाखालील जलसाठयांच्या तर 0 ते 2000 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघुसिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे करण्यात येणारे प्रवाही सिंचन तसेच नदी, नाले, बंधारे व जलाशय इत्यादी भुपृष्ठावरील उपसा सिंचन योजनांची प्रगणना करण्यात येणार असून यासाठी 165 मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले. 

 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश