रिसोड व वाशिम तालुक्यात कायदेविषयक शिबीर

रिसोड व वाशिम तालुक्यात कायदेविषयक शिबीर
 
वाशिम दि 9 (जिमाका) आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आज ९ ऑक्टोबर रोजी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रिसोड तालुक्यातील वाकद, मोठेगाव, बालखेडा व एकलासपूर येथे रिसोड येथील न्या.श्री कोईनकर आणि तालुका विधीज्ञ संघाचे सदस्य यांनी बालकांविषयीचे कायदे आणि महिलाविषयक कायदे या विषयांवर ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
       वाशिम तालुक्यातील मंगळसा, पंचाळा व अजनखेडा येथे मंगरूळपीर येथील न्या.एस.के. मेश्राम आणि न्या.आर एस.मानकर यांनी बालकांचे शिक्षणाविषयी अधिकार याविषयी तर मालेगाव येथील न्या.श्री बोरा यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर