जिल्हयात 7 ऑक्टोबरपर्यंत 7 लाख 75 हजार पात्र व्यक्तींचे लसीकरण

 


जिल्हयात 7 ऑक्टोबरपर्यंत

7 लाख 75 हजार पात्र व्यक्तींचे लसीकरण

वाशिम, दि. 08 (जिमाका) : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने मार्च 2020 मध्ये भारतात प्रवेश केला. कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जगातील वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक परिश्रमानंतर कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली. जिल्हयातील एकूण 13 लाख 74 हजार 735 लोकसंख्यापैकी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सक्षम ठरलेली ही लस जिल्हयात पात्र व्यक्तींना देण्यास 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. जिल्हयातील 9 लाख 82 हजार 300 व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. जिल्हयात 16 जानेवारी 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत 7 लाख 75 हजार 723 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 5 लाख 8 हजार 261 व्यक्तींनी आणि दुसरा डोस 2 लाख 67 हजार 462 व्यक्तींनी घेतला. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 51.74 टक्के आणि दुसरा डोस 27.23 टक्के व्यक्तींनी घेतला.

वाशिम तालुक्यात 2 लाख 4 हजार 501 पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले असता पहिला डोस 1 लाख 17 हजार 533 व्यक्तींनी तर दुसरा डोस 67 हजार 523 व्यक्तींनी घेतला. कारंजा तालुक्यातील 1 लाख 71 हजार 560 लसीकरणासाठी पात्र व्यक्तींपैकी 98 हजार 182 व्यक्तींनी पहिला तर 55 हजार 215 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला.

मंगरुळपीर तालुक्यातील 1 लाख 40 हजार 613 व्यक्तींना लास देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असता पहिला डोस 76 हजार 762 व्यक्तींना तर दुसरा डोस 40 हजार 863 व्यक्तींना देण्यात आला. रिसोड तालुक्यातील 1 लाख 66 हजार 465 व्यक्तींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असता पहिला डोस 1 लाख 5 हजार 173 व्यक्तींना तर दुसरा डोस 55 हजार 234 व्यक्तींना देण्यात आला.

मालेगांव तालुक्यातील 1 लाख 67 हजार 353 व्यक्तींचे लसीकरण करण्याचे नियोजन असून 59 हजार 862 व्यक्तींना पहिला तर 27 हजार 851 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला. मानोरा तालुक्यातील लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या 1 लाख 31 हजार 808 व्यक्तींपैकी 50 हजार 749 व्यक्तींना पहिला आणि 20 हजार 776 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला. विविध लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगीतले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश