जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली
वाशिम, दि. ०४ : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या
अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये २६ तक्रारींवर सुनावणी
घेण्यात आली. यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तसेच उर्वरित सर्व
प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
संबंधित विभागांना केल्या.
यावेळी जिल्हा
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कारंजाचे
उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित असलेल्या
तक्रारींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सर्व शासकीय
विभागांच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या आपल्या
विभागाशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी
दिल्या.
Comments
Post a Comment