श्रेष्ट योजना : विद्यार्थ्यांनी 14 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी
श्रेष्ट
योजना : विद्यार्थ्यांनी 14 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी
वाशिम, दि. 21 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व
सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या इयत्ता ९ वी आणि
इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ट या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरीता
नोंदणी सुरू करण्यात आली आहे. श्रेष्ट योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता ८ वी आणि १०
वीचा विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा कमी असावे.
या योजनेअंतर्गत शिक्षण व राहण्याच्या सोईकरिता CBSE affiliated नामांकित निवासी
शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल. या परीक्षेकरिता शुल्क नसेल. या योजनेतुन इयत्ता 9
वी आणि इयत्ता 11 वी करिता 3000 विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतामधून निवड करावयाची
आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी
https://shreshta.nta.nic.in या संकेतस्थळावर 14 एप्रिल 2022 पर्यंत नोंदणी करावी.
विद्यार्थ्यांची परीक्षा 7 मे 2022 रोजी होणार आहे त्या परीक्षेचा निकाल 20 मे 2022
रोजी जाहिर करण्यात येईल.
या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. अधिक
माहितीसाठी https://shreshta.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट दयावी.
*******
Comments
Post a Comment