भारतीय डाक विभागामार्फत महिला दिनानिमीत्त डाक कर्मचारी महिलांचा
भारतीय डाक विभागामार्फत
महिला दिनानिमीत्त डाक कर्मचारी महिलांचा सन्मान
वाशिम,दि.९ (जिमाका) जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी भारतीय डाक विभागामार्फत वाशिम उप विभागातील डाक कर्मचारी महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अकोला डाक विभागाच्या वाशिम उप विभागातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी डाक विभागाचे उप विभागीय अधिकारी सुनील हिवराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, कौशल्य विकास अधिकारी सीमा खिरोडकर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीमती सुनंदा बजाज यांनी डाक कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले.महिलांनी त्यांच्या चाकोरीतून बाहेर पडून कर्तुत्व घडवावे असे सांगितले.श्रीमती खिरोडकर यांनी प्रगल्भ विचारांनी प्रत्येक महिलांनी शृंगारीत व्हावे असे उपस्थित सर्व कर्मचारी महिलांना आवाहन केले.
यावेळी वाशीम उप डाक विभागामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रोस्ताहनपर बक्षीसे देण्यात आली.प्रथम-जोस्ना वाघमारे, द्वितीय
–सुनिता यादव,तृतीय–राधा बेंगाल यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपविभागीय डाक अधिकारी सुनील हिवराळे,वाशिम मुख्य डाकघरचे पोस्ट मास्टर श्री. रामेश्वर अलोणे यांनी सुदधा सर्व डाक कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता महाल्ले- शाखा डाकपाल हिवरा (रोहिला) आणि आभार प्रदर्शन कु. पल्लवी मुठाळ -शाखा डाकपाल नागठाणा यांनी मानले.
Comments
Post a Comment