मृत मासेमाराच्या वारसदारास जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
मृत मासेमाराच्या वारसदारास
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
वाशिम, दि. 29 (जिमाका) : मासेमार संकट निवारण निधी या योजनेअंतर्गत मासेमारी करतांना मच्छिमारांचा अपघाती मृत्यु झाल्यास
अथवा बेपत्ता झाल्यास या योजनेअंतर्गत मच्छिमारांच्या वारसदारास अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. मासेमार संकट निवारण निधी या योजनेअंतर्गत आज २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराज एस. यांच्या हस्ते मानोरा तालुक्यातील धामणी येथील श्रीमती बेबी गजानन खोडके या मृत मच्छिमाराच्या कायदेशिर वारसदारास एक लक्ष रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त एम. व्ही. जयस्वाल, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ए. व्हि. जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती ए. आर. जैन, व स्नेहा प्रबत यांची उपस्थिती होती.*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment