ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब क्यूआर कोडची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 

ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब

  क्यूआर कोडची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

            वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी/ कुल कॅब मालक/चालकांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या ठरावानुसार निर्णयाची व महिला सुरक्षिततेसाठी नियमाची अंमलबजावणी करण्याचे सुचित केले आहे. त्याअनुषंगाने राज्य परिवहन प्राधिकरणाने मिटर टॅक्सी (काळी- पिवळी व कुल फॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशिल,परवान्याचा तपशिल, वाहनाचा व वाहन चालकाचा तपशिल तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक व संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक दर्शविणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पध्दतीने प्रदर्शित करण्याचे सुचित केले आहे.

               परवान्यावरील वाहनामध्ये परवान्याचा व वाहन चालकाचा तपशिल वरील नमुद केलेल्या बाबी प्रवाशांना सहज दिसेल अशा पध्दतीने प्रदर्शित करावा.सुचनेची अंमलबजावणी न करण्याऱ्या ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब मालक सदरच्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत कार्यवाही करण्यात येईल.याबाबत नोंद घेण्यात यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे