केनवड येथे लोक कलाकारांनी दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती



केनवड येथे लोक कलाकारांनी दिली

जनकल्याणकारी योजनांची माहिती

             वाशिम, दि. 09 (जिमाका) : रिसोड तालुक्यातील केनवड येथे आज 9 मार्च रोजी आयोजित एका कार्यक्रमात कलापथकांच्या कलाकारांनी राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त लोककलाच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला सरपंच नीता गोडे, उपसरपंच विकास खराटे, पोलीस पाटील मानिक खराटे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गोडे व ग्रामपंचायत सचिव जे.यु. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

                भरारी सांस्कृतिक कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण व ग्रामिण विकास बहुउद्देशिय संस्थेचे कलावंत विद्या भगत व त्यांच्या सहकलावंतांनी राज्य सरकारने दोन वर्षात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती नागरीकांचे मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली. यामध्ये शिवभोजन योजना, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल, जलजीवन मिशन, आरोग्यविषयक माहिती व स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग यासह अन्य योजना व उपक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमाला केनवड येथील नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.   

*******

 

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित