आता 16 मार्च रोजी मानोरा येथे आर.टी.ओ शिबीर
- Get link
- X
- Other Apps
आता 16 मार्च रोजी मानोरा येथे
आर.टी.ओ शिबीर
वाशिम, दि. 04 (जिमाका) : मोटार वाहन चालक/ मालक यांच्या सोयीसाठी कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करुन मोटार वाहन निरीक्षक यांचा वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मानोरा येथे 17 मार्च 2022 रोजी मासिक शिबीर दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतू जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केल्यामुळे या कार्यक्रमात अंशत: बदल करुन 17 मार्च ऐवजी आता 16 मार्च 2022 रोजी मानोरा येथे आर.टी.ओ शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी मानोरा तालुक्यातील संबंधित नागरीकांनी याची नोंद घेऊन शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment