घरकुल योजना जिल्हास्तरीय अपील समितीच्या सभेत २३५ लाभार्थी पात्र
- Get link
- X
- Other Apps
घरकुल योजना
जिल्हास्तरीय अपील समितीच्या सभेत २३५ लाभार्थी पात्र
वाशिम दि.१२ (जिमाका) घरकुल योजनेच्या संदर्भात जिल्हास्तरीय अपील समितीची सभा ११ मार्च रोजी समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात संपन्न झाली.या सभेला समितीचे अशासकीय सदस्य गजानन आरु समितीचे सचिव तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीतील ६२ ग्रामपंचायतीच्या ६०९ घरकुल आक्षेप अर्जावर पुराव्यानिशी चर्चा करण्यात आली.यामध्ये २३५ अर्ज पात्र तर ३७४ अर्ज अपात्र ठरले. पंचायत समितीला तालुकास्तरीय समितीकडे हे आक्षेप अर्ज आल्याने पुढील अपिलासाठी आजच्या जिल्हास्तरीय समितीपुढे हे अर्ज पात्रतेसाठी ठेवण्यात आले.ग्रामसभांमध्ये जी घरकुल लाभार्थ्यांची यादी ठेवण्यात आली होती त्यामध्ये जे लाभार्थी अपात्र ठरले अशा लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीकडे आक्षेप अर्ज दाखल केले होते.अशा लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करून त्यांच्या घराचे फोटो, चित्रीकरण करण्यात आले.घराचा नमुना ८ अ, सातबारा, स्थलांतरित, बागायतदार असल्यास व घरी वाहन असल्याचे पुरावे जिल्हास्तरीय समितीकडे आज सादर करण्यात आले.समितीने अत्यंत काळजीपूर्वक सर्व पुरावे बघून पात्र व अपात्र लाभार्थी निश्चित करण्यात आले.
वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ४० ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे ४६४ आक्षेप अर्ज होते.त्यापैकी १४४ लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरले. ३२० अर्ज अपात्र ठरले. मंगरुळपीर पंचायत समितीमधील दोन ग्रामपंचायतीमध्ये चार आक्षेप अर्ज होते. त्यापैकी चारही अर्ज अपात्र ठरले.कारंजा पंचायत समितीच्या पाच ग्रामपंचायतअंतर्गत १३ आक्षेप अर्ज होते.त्यापैकी ८ अर्ज पात्र ठरले तर पाच अर्ज अपात्र ठरले.
मालेगाव पंचायत समितीमधील सात ग्रामपंचायतीमधून ५० आक्षेप अर्ज आले. त्यापैकी ३४ अर्ज घरकुलासाठी पात्र ठरले.तर १६ अर्ज अपात्र ठरले.मानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीअंतर्गत दोन आक्षेप आले.त्यापैकी एक लाभार्थी अर्ज पात्र आणि एक अर्ज अपात्र ठरला.
रिसोड पंचायत समितीमधील सहा ग्रामपंचायतीमधून ७६ आक्षेप आले.त्यापैकी ४८ लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरले.२८ अर्ज अपात्र ठरले.आजच्या जिल्हास्तरीय अपील समितीच्या सभेत जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या ६०९ घरकुलांच्या आक्षेपांवर चर्चा करण्यात आली.यामध्ये २३५ लाभार्थी घरकुलासाठी पात्र ठरले.तर ३७४ अर्ज अपात्र ठरले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment